आजरा तालुक्यात १०० वर्षांपूर्वी इचलकरंजी संस्थानाच्या काळात आजरा शहरात आजरा ग्रामीण विकास सेवा स्थापन झाली तालुक्यात १८९४ मध्ये आजरा शहरात पहिली ग्रामीण विकास सेवा स्थापन झाली यानंतर १९१९ मध्ये भादवण मध्ये विविध कार्यकारी विकास सेवा स्थापन झाली. ६०च्या दशकात गावोगावी सेवा संस्था सुरू झाल्या तालुक्यात सध्या १११ विविध कार्यकारी विकास सेवा संस्था कार्यरत आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून पत पुरवठा सह विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्था करीत आहेत.
गावागावातील विकास सेवा संस्था यापूर्वी निव्वळ कृषी पतपुरवठ्याचे काम करत होत्या. केंद्र सरकारच्या कायद्यातील नवीन बदलांमुळे या संस्थांना आता १५३ नवीन उद्योग- व्यवसाय सुरू करता येणार आहेत. सेवा संस्थांच्या आधुनिकीकरण व बळकटीकरणांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान मोठे आहे.देशातील प्राथमिक सेवा संस्थांना आत्मनिर्भर भारत अभियानाच्या धर्तीवर स्वावलंबी बनवण्यासाठी संगणकीकरणाचा प्रकल्पही केंद्र सरकारने हाती घेतला आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पॅक्स टू मॅक्स धोरणांतर्गत शेतकऱ्यांना विविध सेवा- सुविधा आपल्या गावातच मिळून वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे .
---------
बेलेवाडी विकास सेवा संस्था पाच वर्षांपूर्वी केटरिंग व्यवसायात उतरली आहे ग्रामीण भागात सार्वजनिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी जमिनीवर बसावे लागते मात्र नागरिकांचे जीवनमान उंचावल्याने जमिनीवर बसून जेवताना नागरिक नाक मुरडतात वयोमानानुसार जेष्ठ नागरिकांना जमिनीवर बसून जेवता येत नाही बेलेवाडी विकास सेवा संस्थेने ग्रामस्थांची गरज ओळखून जेवणावेळी साठी लागणारे ५० टेबल व २५० प्लास्टिक खुर्च्या खरेदी केल्या. यासाठी १ लाख ९६ हजार रुपये गुंतवणूक केली.सभासदांना नाममात्र भाडे व इतरांना नियमित भाडयाने हे साहित्य देण्यात आले . सहा वर्षात१लाख ५० हजार रुपये चा फायदा झाला. गजरगाव येथील लक्ष्मेश्वर सेवा संस्थेने गावातील नागरिक व सभासदासाठी शुद्ध पाणी प्रकल्प सुरू केला आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील या संस्थेने आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याचा निर्णय घेतला. यासाठी पाच वर्षांपूर्वी साडेसात लाख रुपये खर्च करून भांडवलातून या प्रकल्पाची उभारणी केली संस्थेला आतापर्यंत चार लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. या संस्थेमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय आजरा येथील दत्त व्हिलेज सेवा संस्थेने स्वतःचे मालकीचे गाळे बांधून ते भाड्याने दिले आहेत .यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे. पेरणोली येथील संस्थेने बांबू व काजू लागवडीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
---------
प्रतिक्रिया....
आजरा तालुका डोंगराळ व दुर्गम असून तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक योजणांचा लाभ मिळावा ह्यासाठी काजू बरोबरच बांबू या पिकासाठी शासनाच्या शून्य टक्के कर्ज योजनेतून जिल्हा बँकेमार्फत लाभ दिला जात आहे. विकास संस्थांनाही स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने विविध प्रकारचे सुमारे १५० व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
सुनील दिवटे
विभागीय अधिकारी, के डी सी सी, आजरा तालुका.
-----------
दृष्टिक्षेपात विकास सेवा संस्था.
*एकुण विकास सेवा संस्था - १११
*एकुण सचिव -४५
*एकुण सभासद -१२७३१
*संगणीकृत संस्था १०८
*स्वतःचे गोडावून असलेल्या
संस्था - ११
*सी.एस.सी सेंटर - ५४
*एकुण कर्ज वाटप -८२ कोटी ९८लाख.
*मस्त्य व्यवसाय, पशुसंवर्धन यासाठी कर्जवाटप -२९७ सभासदांना ७६लाख ४३हजार.