Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

शेतकऱ्यासाठी कॅन मधून इंधन पुरवठा सुरू करा ; सरपंच संघटनेची मागणी .

Location: **उत्तूर** | Published: **November 29, 2025**

शेतकऱ्यासाठी कॅन मधून इंधन पुरवठा सुरू करा ;  सरपंच संघटनेची मागणी .

शेतकऱ्यासाठी कॅन मधून इंधन पुरवठा सुरू करावा अशी मागणी सरपंच संघटनेने निवेदनाद्वारे आजरा तहसीलदारांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल पंपावर कॅन मधून पेट्रोल व डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे . मात्र यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे‌ ट्रॅक्टर, पावर टेलर जेसीबी तसेच भात कापणी यंत्रासारखी अवजारे व यंत्रणा पंपावर आणणे अशक्य असल्याने कॅनमधून इंधन पुरवठा ची मुभा देणेत यावी.सध्या भात कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे मशीन साठी इंधन हा अत्यावश्यक घटक आहे. शेकरी मजबूत प्लास्टिक कॕनचा वापर करून सुरक्षितपणे इंधन आणतील .कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेतली जाईल. निवेदनावर तालुकाध्यक्ष बापू निउंगरे, अमोल बांबरे, भारती डेळेकर, सुषमा पाटील, सारिका पाटील, कल्पना डोंगरे ,महादेव दिवेकर, विजय गुरव आदींच्या सह्या आहेत.