Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

समिक्षा रामाणे बनली बेलेवाडीतील पहिली महिला पोलीस

Location: **उत्तूर ** | Published: **June 1, 2026**

समिक्षा रामाणे बनली बेलेवाडीतील पहिली महिला पोलीस

अशोक तोरस्कर, उत्तूर ...
----------------
तिच्या डोळ्यात एक स्वप्न होतं
पोलीस बनायचं...
हे स्वप्न तिने फक्त पाहिलं नाही
तर ते पूर्ण करण्यासाठी ती रोज झगडत राहिली..
गेल्या दोन वर्षापर्यंतच्या अभ्यासातील सातत्य ,
मेहनत आणि चिकाटी जवळून पाहणाऱ्यांना एक गोष्ट नेहमी जाणवत होती
ही मुलगी थांबणार नाही...
तिची तळमळ तिचे समर्पण स्पष्ट दिसायचं.. ती म्हणायची एक दिवस मी नक्की पोलीस होणार
आणि शेवटी तो सोनेरी दिवस उजाडला आणि एका
कष्टाळू कुटुंबातील समिक्षा
पोलीस बनली...
आजरा तालुक्यातील चिकोत्रा नदिकाठी वसलेले बेलेवाडी
हुबळगी गाव.
येथील सुभाष रामाणे यांच्या
कष्टाळू कुटुंबातील समिक्षा ही पोलीस बनली आहे.
गावाच्या इतिहासातील पहिलीच महिला पोलीस बनल्याने
तिचे कौतुक होत आहे.
समिक्षा ही कष्टाळू आणि
मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे शेतकरी सुभाष रामाणेआणि कल्पना रामाणे यांची मुलगी आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीत
मुंबई पोलीस परीक्षेत तिची निवड झाली .तिने हे यश दुसऱ्या प्रयत्नात मिळविले असून आगामी काळात पदवी पूर्ण करुन स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याची तिची इच्छा आहे . समिक्षाची पोलीस पदी झालेली निवड गावातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
तिचे पहिली ते सातवी प्राथममिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण गावातीलच चोरगे विद्यालयात झाले तर अकरावी -बारावी शिक्षण गडहिंग्लज येथे झाले . आई-वडीलासह भाऊ अनिकेत यांने आपली बहीण पोलीस व्हावे यासाठी प्रयत्न केले. तिला खाजगी अकाॕडमी मध्ये प्रवेश मिळवून दिला. भावाने नोकरी करून बहिणेने पाहिलेल्या स्वप्नांना बळ दिले. समिक्षाने जिद्दीने शिक्षण घेत आई -वडिलांची पूर्ण केलेली इच्छा तसेच त्यातून गावातील पहिली महिला पोलीस बनण्याचा तिला मिळालेला मान या बाबी कौतुकास्पद ठरल्या आहेत. या यशानंतर तिचे तसेच मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आई -वडिलांचे विविध संस्थांनी अभिनंदन केले .
चौकट.
बळीराजा अकॕडमी , गंगापूर चे अजित जाधव -पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व भाऊ अनिकेत यांनी उचललेली आर्थिक जबाबदारी मुळे आपले स्वप्न साकार झालेचे समिक्षा ने सांगितले.