उत्तूरला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
उत्तूर ता.१४
येथील मिलिंदनगरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल हुले यांनी स्वागत केले. माजी सभापती वसंतराव धुरे यांच्या हस्ते द्विपप्रज्वलन व जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
पंचायत समिती सदस्य विकास चोथे व सरपंच किरण आमणगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच सुनिता हतीरगे , विठ्ठल उत्तूरकर,विजय हेगडे, गिरीश ऐवाळे, समीर हेगडे,भारत ऐवाळे, अमोल ऐवाळे, सुधाकर हुले,
वसंतराव कांबळे,दिपक कांबळे, परशराम कांबळे, लता कांबळे,ग्रामपंचायत सदस्य, सदस्या उपस्थित होत्या.रुपाली कांबळे यांनी सुत्रसंचालन केले.
उपाध्यक्ष संतोष हेगडे यांनी आभार मानले.
फोटो.
उत्तूर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना शिरीष देसाई, वसंतराव धुरे,विजय गुरव, रामदास आजगेकर व इतर मान्यवर.
---------
अशोक तोरस्कर,उत्तूर