उत्तूरला बाजार लिलावात भाजी व्यापा-याना दिलासा.
उत्तूर ता.३१
उत्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने बाजार लिलाव ग्रामसचिवालयच्या सभागृहात झाला. यामध्ये पावतीचा दर कमी केलेने भाजी व्यापा-याना दिलासा मिळाला. व्यापां-याना अधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते.
ग्रामविकास अधिकारी पी.के.पाटील यांनी स्वागत केले.
उत्तूरला दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. परिसरातील ४० गावातील नागरिक खरेदीसाठी येतात. व्यपा-यांची संख्या ही लक्षणीय असते. या बाजार करातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यातूनच सोयी सुविधा मिळाव्यात अशी व्यापां-याची अपेक्षा असते. यानुसार हा लिलाव झाला.
यावर्षीचा लिलाव ८लाख ५० हजार रुपयाला अभिजित कलाकते यांनी घेतला. भाजीविक्री व अन्य साहित्य विक्री करणा-या व्यापाराना जागे नुसार ५०व ९०रुपये आकारण्याचा निर्णय झाला. टोपली घेऊन विक्रीसाठी बसणा-याना १०रुपये व बक-यासाठी २० रुपये आकारण्याचे ठरले.व्यापारांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी दिवसभर पाण्याचा टँकर भरुन ठेवण्यात येईल. एटीएम पाण्याची सोय केली आहे. बाजारादिवशी काही वेळा लवकर अंधार पडतो.यासाठी मोठ्या क्षमतेचे बल्ब लावण्यात आले आहेत. पुरुष व स्त्रिया यांचेसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. बाजारादिवसी गैरसोय दुर झाल्याने व्यापा-यातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी उपसरपंच सुनिता हातरगे, भैरु कुंभार, संभाजी कुराडे, मिलिंद कोळेकर, लता गुरव, सविता सावंत , धोंडिराम कलाकते व नागरिक उपस्थित होते. सचिन फाळके यांनी आभार मानले.
फोटो.
उत्तूर - अभिजित कलाकते यांचा सत्कार करताना सरपंच किरण आमणगी, सोबत उपसरपंच सुनीता हातरगे व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या.
----------
अशोक तोरस्कर,उत्तूर