Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

उत्तुर येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन*

Location: **उत्तूर ** | Published: **April 2, 2026**

उत्तुर येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन*

*उत्तुर येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन*

उत्तुर: हिंदू धर्म, संस्कृती व परंपरेचे जतन तसेच समाजामध्ये एकता आणि बंधू भाव वाढविण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्तुर येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ एप्रील रोजी वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार असुन यावेळी श्री क्षेत्र पंढरपूर येथील ह भ प देवव्रत महराज वास्कर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील शरददत्त दास बुवा घाग, वेद शास्त्र संपन्न डॉ. के. डी. हिरेमठ, आकाराम महाराज पोवार, स्वामी शिवयोगी नाथ महाराज, गुरुवर्य किसन महाराज, तानाजी पाटील (देव मामा) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्त दुपारी ४:३० वाजता उत्तुर स्वागत कमान ते इंदिरानगर या मार्गावरून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. या संमेलनासाठी उत्तुर आणि परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.