धामणे येथील युवकांनी उभारली भुदरगड दुर्गावर गुढी.
उत्तूर ता.१९
धामणे (ता.आजरा) येथील फ्रेंडशिप मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे मंडळाचे सचिव श्री सुनील मगदूम व शिवभक्त यांनी भुदरगड हून शिवज्योत आणून गावभर लेझीम खेळत मिरवणूक काढून छत्रपतींच्या मूर्तिचे पूजन करण्यात आले.महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. चिमुकल्यांनी भाषण व नृत्य सादर केले. शिवजयंती पासून शंभूराजे यांचा बलिदान मास शुभारंभ झाला.यामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड, ओंकार भोसले, रोहित सावंत, प्रवीण मातले,रोहन सावंत, श्रावणी मगदूम,अंकिता गायकवाड, सोहम गिजवणे, आदित्य पोवार, ओवी आरेकर, अनुष्का मगदूम, वरद आरेकर, आदींनी तब्बल 30 दिवस एकवेळ आहार,गोड वज्र,विनाचप्पल, आणि दररोज शंभूराजे यांचे कवण वाचन केले.यामध्ये महिलांचा सहभाग लाभला.
आणि अखेर बलिदान मास चा शेवट आज भुदरगड दुर्ग येथे मूक पदयात्रा जाऊन मंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव आरेकरसो यांचे हस्ते गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले. पुजारी अभिजीत गुरव यांचे सहकार्य लाभले.
------------
अशोक तोरस्कर, उत्तूर