'क्रीडो' शिक्षण पद्धती बालकांसाठी आदर्श ; ज्योती मगदूम
उत्तूर ता.१६
नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत राबवण्यात येत असलेली 'क्रीडो' ही शैक्षणिक अभ्यासाची पद्धत लहान बालकांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असून ही शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन समर्थ कम्पुटर अकॅडमी च्या संचालिका ज्योती मगदूम यांनी केले.त्या क्रीडो अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित पूर्व प्राथमिक वरिष्ठ गट पदवीदान समारंभाच्या निमित्ताने बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय सावेकर होते .यावेळी ज्ञानदेव आरेकर, प्रिती पवार , क्रीडो शिक्षणाधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे नियोजन रेश्मा माळवकर, प्रतिभा सुतार, रोहिणी जाधव यांनी केले.
प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांनी स्वागत केले.प्राची येजरे यांनी सूत्रसंचालन केले. हिमानी रेडेकर यांनी आभार मानले.
फोटो.
उत्तूर -विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करताना ज्योती मगदूम व इतर मान्यवर.
----------
अशोक तोरस्कर, उत्तूर