Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

*शिवराज विद्यालय चिमणे शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदिच्छा भेट.*

Location: **उत्तूर ** | Published: **March 12, 2026**

*शिवराज विद्यालय चिमणे शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदिच्छा भेट.*

*शिवराज विद्यालय चिमणे शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदिच्छा भेट.*
चिमणे ता. आजरा येथील जिल्हा परिषदेच्या शिवराज विद्यालय चिमणे या प्रशालेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने त्यांनी चिमणे या गावी भेट दिली होती.
गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शाळेच्या जुन्या इमारतीच्या दुरुस्ती कामाची साहेबांनी पाहणी केली. त्यानंतर कंपाउंड वॉलच्या प्रश्ना संदर्भात पाहणी करून निधी देऊन कंपाउंड वॉलचा प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही दिली.
शाळेच्या प्रांगणात आल्याबरोबर मुलांनी व्हरांड्यात पुष्प देऊन व टाळ्यांच्या गजरात साहेबांचे स्वागत केले.
गावचे सरपंच श्री सुनील कांबळे व श्री समीर देशपांडे यांच्या शुभहस्ते साहेबांचा व उपस्थित ग्रा पं सदस्यांच्या व ग्रामपंचायत अधिकारी श्री पांडुरंग खवरे यांच्या हस्ते सोबत असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साहेबांनी उपस्थितांना पंचायतराज समृद्ध अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. शाळेबरोबरच चिमणे गावाच्या गुणांकन वाढीसाठी प्रशासकीय पातळीवर आपण सदैव सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगून स्मशानभूमी व पानंद रस्त्यांचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली. शालेय कामकाजबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यस्थळी गटविकास अधिकारी सावंत साहेब, केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई, उपसरपंच गुणवंता बेलकर, संभाजी तांबेकर, अभिजित मोरे, भूषण नादवडेकर सुरेखा शिंदे, आजी माजी सरपंच, ग्रा प सदस्य, शा व्य समिती सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक श्री हणमंत सुतार सर यांनी, प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार श्री समीर देशपांडे यांनी तर आभार शिक्षक श्री संदीप लकांबळे यांनी मानले.
------------
अशोक तोरस्कर, उत्तूर