जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोधमध्ये पार्वती- शंकरचे ७ विद्यार्थी चमकले
प्रज्ञाशोध परीक्षेतील यशाची परंपरा कायम.
अशोक तोरस्कर; उत्तूर न्युज.
उत्तूर ता.७
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व जिल्हा विज्ञान समिती यांचेद्वारा आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत पार्वती- शंकर शैक्षणिक संस्थेच्या विद्यामंदिर व विद्यालयाचे ७ विद्यार्थी यंदा प्रज्ञापात्र ठरले.
विद्यामंदिरमधील इ.६वी मधून ९ विद्यार्थी प्रावीण्यपात्र ठरले होते. त्यामधून श्रेयश प्रमोद पाटील याने ८२गुण व अथर्व संतोष कुंभार याने ७८ गुण घेऊन संघाचे शिल्ड संपादले. तर राहत इम्रान तासेवाले ७६ गुण घेऊन प्रमाणपत्र पात्र ठरला.
विद्यालयामधील इयत्ता ९ वी मधून तब्बल २३ विद्यार्थी प्रावीण्यपात्र ठरले होते. त्यामधून कु. श्रावणी विकास पाटील गुण- ८८ ; कु. राजनंदिनी भरत सुतार गुण- ८६ व कु. अंतरा सुनील पाटील गुण - ८६ घेऊन शिल्डपात्र ठरले . तर कु. शौर्या समीर पाटील ८४ गुण घेऊन प्रमाणपत्र पात्र ठरली.
प्रतिवर्षी शैक्षणिक संकुलात या परीक्षेस मोठ्या संख्येने विद्यार्थी बसवून त्यांचे मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. विद्यार्थ्यांचा विज्ञान अभ्यासाचा पाया भक्कम व्हावा व भविष्यातील विज्ञान करिअरमध्ये लाभ व्हावा या हेतूंनी या परीक्षा
महत्त्वाच्या ठरतात .इयत्ता ९ वीसाठी श्री पंडित वंजारे व इयत्ता ६ वीसाठी सौ.भारती शिवणे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष श्री विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम्. पाकले, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, श्री विनायक करंबळी यांचे प्रोत्साहन शिक्षक व विद्याथ्यार्थ्यांना मिळाले . संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले आहे.
-----------
अशोक तोरस्कर,उत्तूर