बिबट्याने पळवली कुत्रे, हाजगोळी खुर्द मधील घटना
आजरा दि. ७
आजरा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्या मानवी वस्ती परिसरात वावरत आहे. यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हाजगोळी खुर्द येथील डॉ. सुधाकर जाधव यांच्या घरासमोरून बिबट्याने कुत्रे पळवले आहे. या आठ दिवसात या परिसरातील दोन कुत्री बिबट्याने पळवून त्यांचा फडशा पाडला आहे.
गेले दोन महिने पेरणोली हाजगोळी व हत्तीवडे परिसरात बिबट्याचा वावर सुरूच आहे. तो मानवी वस्तीकडे येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शेताकडे किंवा अन्य कामासाठी जाताना खबरदारी घ्यावी लागत आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे. यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. चौकट..
त्यांनी ठोकली धूम...
देवकांडगाव (ता. आजरा) येथील राजाराम राणे यांचे जंगला शेजारी शेत आहे. या शेताकडे कामासाठी गेल्यानंतर राणे यांना झुडपात हालचाल आढळली. त्या दिशेने राणे यांनी पाहिल्यानंतर समोर बिबट्या उभा होता. बिबट्याला पाहताच राणे हे गर्भगळीत झाले व त्यांनी गावाकडे धूम ठोकली.