उत्तूर...
आरोग्य विभाग नागरीकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, येथे कोणीही, कोणताही स्वार्थ न ठेवता काम केले पाहिजे तरच रूग्णांचा विश्वास संपादन करता येतो असे मत सरपंच किरण आमणगी यांनी केले ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत शर्मा यांच्या शुभेच्छा समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानीअतिषकुमार देसाई होते.
डाॅ. शर्मा यांचा उत्तूरवासींच्या वतीने सत्कार करण्यात आला. मी सामान्य रूग्णांसाठी वेळ काळ न बघता निस्वार्थी काम केले यामुळे रूग्णसंख्या वाढण्यास मदत झाली असे मत डॉ शर्मा यांनी व्यक्त केले.
यावेळी सौरभ वांजोळे, शिवाजी कांबळे, महेश करंबळी, रेश्मा कुंभार यांची भाषणे झाली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सौरभ कसबे, डाॅ. अर्चना देशमाने, संभाजी कुराडे, संजय गुरव, अनिता घोडके, बाळू सावंत उपस्थीत होते. विजय पाटील, प्रदिप लोकरे, महेंद्र मिसाळ यांनी संयोजन केले. स्वागत प्रविण लोकरे यांनी स्वागत केले. मंदार हळवणकर यांनी आभार मानले.
फोटो
उत्तूर - डाॅ. रविकांत शर्मा यांचा सत्कार करताना उमेश आपटे, सरपंच किरण आमणगी, अतिषकुमार देसाई, डाॅ. सौरभ कसबे व इतर मान्यवर
------------
अशोक तोरस्कर, उत्तूर