मुंबई मराठी साहित्य संघ आणि कुमुद विद्यामंदिर देवनार यांच्यावतीने बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बालसाहित्यिक आरदाळ (ता. आजरा) येथील सदानंद पुंडपाळ यांची निवड झाली आहे. ३ डिसेंबरला कुमुद विद्यामंदिर देवनार येथे हे संमेलन होणार आहे .संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री व निर्माती श्रद्धा हांडे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचे हे तिसरे एक दिवशीय संमेलन आहे. संमेलनाचे समन्वयक एकनाथ आव्हाड व प्रतिभा विश्वास आहेत .अशी माहिती शाखेच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी दिली .